Advertisement

सावंगी पोलिसांची जलद कारवाई – मोबाईल चोराला तत्काळ अटक

समाचार शेयर करें

सावंगी पोलिसांची जलद कारवाई – मोबाईल चोराला तत्काळ अटक

वर्धा (सावंगी प्रतिनिधी)
वर्धा–देवळी महामार्गावरील सेलसुरा गावात प्रवेश करणाऱ्या पुलाखाली एका अनोळखी इसमाने बोरगाव येथील शिवकुमार आत्राम यांना अडवून वाद घातला आणि त्यांचा मोबाईल हिसकावून पळ काढला. नऊ हजार रुपये किमतीचा Vivo कंपनीचा मोबाईल चोरीस गेल्याची तक्रार शिवकुमार यांनी सावंगी पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली.
तक्रार मिळताच सावंगी पोलिस स्टेशनचे ठाणेदार श्री. पंकज वाघोडे यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी देवळी येथील बेघर वस्तीत राहणाऱ्या रणजीत पारिसे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडे चोरीचा मोबाईल आढळून आला.
या प्रकरणात सावंगी पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. आरोपीने यापूर्वीही तत्सम चोरीच्या घटना केल्या असल्याचा संशय पोलिसांना असून, ठाणेदार श्री. वाघोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!