वर्धा (मंगेश चोरे पाटील) सेलू परिसरात खुलेआम डिझेल पेट्रोल तस्करी कुणाच्या आशिर्वादाने सुरू आहे याचा जनतेला अंदाज आलेला असुन मागील काही दिवसापासून कार्यरत ठाणेदारांनी खुलेआम अवैध वेवसायिकांना मुभा दिल्याचे पोलीस वर्गातून पुढे येत आहे.लाखो रुपयांची लेणदेन करून अवैध वेवसाय करणाऱ्यांना परवानग्या देण्यात आल्याचे पोलीस वर्तुळातूनच पुढे येते.
परिसरात नवनविन लोकांनी अवैध धंदे सुरू केले असुन.परिसरात अशांतीचे वातावरण निर्माण झाले आहे.वर्तमान पत्रात ही वस्तुस्थिती प्रकाशित करताच ठाणेदार पत्रकाराणां प्रशासनाच्या विरोधात जाणे महागात पडू शकते अश्या स्वरूपाच्या धमक्या सुद्धा देत असल्याचे पुढे आले आहे.
प्रकाशित बातम्या हवेत नसून याचे सविस्तर पुरावे ठेऊनच बातम्या प्रकाशित केल्या जातात याची जाणीव सुद्धा असायला हवी. बातम्या प्रकाशित केल्याने कुणावर कारवाई करावी अथवा करू नये.हे समंधित विभागातील वरिष्ट आधीकाऱ्यांचा निर्णय असतो.मात्र बातम्या प्रकाशित करू नयेत . हा बातमीदाराचा निर्णय असतो.चुकीचे काम अथवा भाष्टाचार ,ही बाब सुद्धा साविधानिक नाही याचा विरोध करणे ही जबाबदारी म्हणुन वर्तमान पत्र बातम्या प्रकाशित करीत असतो… सेलू परिसरात सुरू असलेल्या अनागोंदी कारभारावर लक्ष केंद्रित करावे अशी जनतेची मागणी आहे.
येथिल ठाणेदार यांच्याविरोधात असंतोष निर्माण झाला आहे.यावर वरिष्ठानी लक्ष वेधावे अशीही मागणी आहेत.
Leave a Reply