Advertisement

सेलू ठाणेदाराची हिंगणीतून दोन लाखांची वसुली? राय नामक ‘किंग मास्तर’कडे सूत्रे?

समाचार शेयर करें

सेलू ठाणेदाराची हिंगणीतून दोन लाखांची वसुली? राय नामक ‘किंग मास्तर’कडे सूत्रे?

Screenshot

वर्धा (प्रतिनिधी) : हल्ली पोलीस विभागात पैसे कमावण्याच्या नादात कर्मचारी बेजार आणि साहेब मालामाल, असा प्रकार सेलू पोलीस ठाण्यात सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कर्मचारी सामूहिक आंदोलन करण्याचा नवा विक्रम करण्याच्या पवित्र्यात असल्याचे दिसून येत आहे.

येथील ठाणेदारांच्या संदर्भात यापूर्वी नागपूर येथील बेला पोलीस ठाण्यातील कर्मचारी वर्गाने त्यांच्या हाताखाली सामूहिकपणे काम न करण्याचे निवेदन पोलीस अधीक्षक, नागपूर यांना दिल्यानंतर त्यांची तत्काळ उचलबांगडी करण्यात आली होती. हा प्रकार पोलीस खात्यातील अनोखा प्रकार मानला गेला होता. आता तोच प्रकार पुन्हा होण्याची शक्यता निर्माण झाल्याची चर्चा आहे.

साहेबांचे विशेष म्हणजे, साहेब स्वतः सर्व देवाण-घेवाण करून वसुलीही तेच करतात, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, हिंगणी परिसरात ‘राय’ नामक व्यक्तीला सक्रिय करण्यात आले असून, ऐंशी हजार रुपयांची हप्ता बांधणी करण्यात आल्याची चर्चा आहे. याशिवाय त्यांच्या मर्जीतील काही व्यक्तींना सक्रिय करून मासिक दोन लाख रुपयांची वसुली नियमित सुरू असल्याचा आरोप केला जात आहे.

सदर बाब कोणाला बदनाम करण्याच्या हेतूने प्रकाशित करण्यात येत नसून, संबंधित यंत्रणेने या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास सत्य काय आहे, हे स्पष्ट होईल, असा दावा करण्यात येत आहे.

साहेबांची आणखी एक विशेष बाब म्हणजे, नामांकित धंदे बंद करून नवीन लोकांना ‘रोजगार’ देणे, हाच उपक्रम सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हल्ली सेलू पोलीस ठाण्यात ‘रोजगार हमी योजना’ सुरू असल्याची उपरोधिक चर्चा परिसरात रंगली आहे.

विशेष बाब म्हणजे, जिल्ह्यात अनेक वरिष्ठ पोलीस निरीक्षक असताना या ठिकाणी सहायक पोलीस निरीक्षकांची वर्णी लागली. ही बाब आता अनेकांच्या बुडाला लागली असून, संबंधित अधिकाऱ्यांची लवकरात लवकर उचलबांगडी करावी, अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!