अखेर देवळी ठाणेदार कापडे यांची ठाणेदारकी गेली.आय जी साहेबांच्या आदेशाने कपडे मुख्यालयात रवाना.
हेच ते कापडे यांची लाचखोरीच्या प्रकरणात तत्काळ करण्यात आली हकालपट्टी
अनेक विषयात होणार आता चौकशी
कापडे यांच्याकडे करोडोच्या जवळ अतिरिक्त मालमत्ता
वर्धा (मंगेश चोरे पाटील) जिवाचा अटा पिटा करून जिल्हाबाहेर झालेली बदली रद्द करून राजकीय लोकांच्या वरधस्ताने देवळीचे ठाणेदार झालेले श्रीमान कापडे यांची रवानगी काल माननीय श्री संदीप पाटील साहेब पोलीस महानिरीक्षक नागपुर परिक्षेत्र यांच्या आदेशाने वर्धा पोलीस अधीक्षक श्री.सौरब कुमार अग्रवाल यांनी केली.कापडे हे अत्यंत वादग्रस्त अधिकारी असुन यांनी पोलीस अधिकारी असल्याचा अनेकवेळा गैरफायदा घेऊन अनेक बेकायदेशीर कामे केल्याच्या अनेक बातम्या आमच्या वतीने बिनधास्त प्रकाशित केल्या होत्या.मागील काळात सावांगी पोलिसावर करण्यात आलेल्या हमल्याचा मास्टर माईंड कापडे हेच होते.या वेतिरिक्त अनेक खोट्या कामात अग्रेसर कापडे याना केवळ पैसे हेच सर्वस्वी होते.इतकेच नव्हे तर यांची महिला प्रेमी म्हणुन सुद्धा चांगलीच चर्चा असुन यांचेही अनेक पुरावे काही पोलिसांच्या कडेच आहेत.मात्र राजकीय लोकांसोबत चाटूगिरी करणे हा यांचा स्वभाव असल्याने राजकीय दबावाने यांनी देवळीची ठाणेदारकी प्राप्त केली.मात्र साहेबांना खीर पचली नाही आणि वसुलीच्या नादात गरीब पोलीस कर्मचारी लाच लुचपत विभागाच्या हाती लागला.या घटने नंतर अनेक प्रकार पुढे आले त्यात आपल्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव सांगुन वसुली हा प्रकार प्रमुख आहे.सदर अधिकारी याच्यावर यावेळी कुणीही मेहरबानी न करता माननीय श्री संदीप पाटील आय.जी.साहेब नागपुर यांनी आदेशित केल्याने माननीय पोलीस अधीक्षक श्री.सौरब अग्रवाल यांनी कापडे यांची हकालपट्टी करून मुख्यालयात रवानगी केली आहे.
Leave a Reply