Advertisement

केळझर येथिल ढाब्यावर विविध प्रकारची तस्करी..? रोज हजारो लिटर डिझेल पेट्रोलची चोरी.

समाचार शेयर करें

केळझर येथिल ढाब्यावर विविध प्रकारची तस्करी..? रोज हजारो लिटर डिझेल पेट्रोलची चोरी.

Screenshot

वर्धा(बुल्लू शुक्ला)सेलू पोलीस ठाण्याच्या अंतर्गत केळझर येथिल आदित्य ढाब्यावर गेल्या अनेक दिवसापासून खुलेआम मोठ्या प्रमाणात डिझेल पेट्रोलची तस्करी सुरू असून हल्ली सेलू पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष का?असा सवाल पुढे येत आहे. सदर धाबा बंद असुन या ठिकाणी रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात तस्करांच्या कार उभ्या असल्याचे गावकरी सांगतात.दहेगाव येथिल नायरा डेपो मधून निघणाऱ्या टँकर मधुन आलेले शुद्ध हजारो लिटर पेट्रोल डिझेल काढुन या ठिकाणी त्यात मोठी भेसळ केली जाते.पुढे हे भेसळ पेट्रोल पंपावर जात असल्याने अनेकांची वाहने खराब होण्याच्या तक्रारी आहेत.वासविक या डिझेल पेट्रोल मधे ओतला जाणारा पदार्थ कोणता आणि तो कोठून आणला जातो याचा शोध घेणे गरजेचे आहे.सूत्राच्या आधारे आलेल्या माहिती नुसार या ठिकाणी काही नागपुर येथिल घटक मंडळी येऊन आम्ली पदार्थ सुद्धा वर्धा शहरात पुरवठा पुरवठा केला जातो अशी सूत्रांची माहिती आहे.प्राप्त माहितीच्या आधारे इंदोर मध्यप्रदेश येथुन या ठिकाणी रात्री येणारी ती मालवाहक आयसर कुणाची? या वाहनातून येणारा माल कोणता?ह्याची माहिती सेलू पोलिसांना नाही का? हा मोठा गंभीर प्रश्न उपस्तीत होत असुन हल्ली तस्करांचे ठाणेदारांच्या सोबत साठे लोटे असल्याचे कर्मचारीच सांगतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!