सेलू ठाणेदार हटाव. पोलीस अधीक्षकांना महिला मंडळाचे निवेदन?

Screenshot
वर्धा (मंगेश चोरे पाटील) सेलू परिसरात ठाणेदार हटावाच्या मागणीला मोठा जोर दिसत असून, येथील गावागावात विकली जाणारी ठाणेदार आश्रित दारूविक्री महिला मंडळाच्या जिव्हाळ्याची लागली आहे. सर्वत्र अवैध धंदे सुरू असल्याने ठाणेदार हटाव, अशी मागणी जोर धरत आहे. लाखो रुपयांची हप्तेखोरी करून पैसे कमविण्याच्या नादात पोलीस ठाण्यातील कर्मचारी वर्गात अत्यंत मोठा असंतोष निर्माण झाला असून, जो पैसे देत नाही त्याचा कोणताही अवैध व्यवसाय चालू दिला जात नसल्याचे पुढे आले आहे.
सेलू परिसरात नवीन व्यवसाय सुरू करण्यात आले असून, जुने नामांकित दारूविक्रेत्यांना परवानगी नाही. त्यामुळे पुढील काळात सेलू गावात मोठे भांडण होण्याची भीती निर्माण झाली आहे. प्रतिमहिना दहा ते पंधरा लाख रुपये कमविण्याच्या नादात पोलीस कर्मचारी वर्गाला अवैध धंदे पकडण्याची मुभा राहिली नाही.
सेलू परिसरात हल्ली खुलेआम दारू विकली जात असून, परिसरातील हिंगणी भागात मोठ्या प्रमाणात मोहफुलांपासून तयार होणारी दारू ही नावला असून, अनेक विषारी पदार्थ टाकून दारू तयार करण्याचे कारखानेच सुरू झाले असून, सेलू परिसरातून नागपूरसह आर्वी तालुक्यात या दारूचा मोठा पुरवठा होत आहे.
हल्ली गावागावात दारू धंदे सुरू करण्याच्या परवानग्या देणे सुरू असून, प्रथम ठाण्यात बोलावले जाते. यातील हिंगणी भागातील एका दारूविक्रेत्याला साहेबांनी आपल्या केबिनमध्ये बोलावून, “हप्ता किती देणार?” अशी विचारणा केली असता, त्याने, “आपल्यासारखे साहेब अजून मी माझ्या जीवनात बघितलेले नाही. एवढे खादाड साहेब पहिल्यांदाच बघतो. आपल्याला आपण असेपर्यंत दारूचा धंदाच करायचा नाही,” असे उत्तर दिल्याचे मोबाईलवर रेकॉर्ड केले आणि बातमीदाराला ऐकविले. यावरून या ठिकाणी सुरू असलेली दुकानदारी किती खुलेआम सुरू आहे, याचा विचार करावा.
हल्ली दोन दिवस तडकाफडकी रजेवर जाऊन घरातील सर्व नगदी पैशाची विल्हेवाट लावून साहेब आज परत सेलू ठाण्यात हजर झाले असून, पुढील काळात सेलू तालुक्यातून साहेबांची हकालपट्टी करा, या मागणीला जोर येत आहे….
क्रमशः













Leave a Reply