Advertisement

महामार्गावरील बंद ढाब्यात घातक गतिविधी? सेलू पोलिसांना कोणतीही कारवाई करू नये, ठाणेदारांचा आदेश?

समाचार शेयर करें

महामार्गावरील बंद ढाब्यात घातक गतिविधी? सेलू पोलिसांना कोणतीही कारवाई करू नये, ठाणेदारांचा आदेश?

Screenshot

सेलू (तालुका प्रतिनिधी) महामार्गावरील केळझर येथील बंद ढाब्यात घातक गतिविधी चालत असल्याचे सूत्रांकडून पुढे आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून डुबलेल्या या बंद ढाब्यासमोर दिवसभर सहा ते सात कार लागलेल्या असतात. अनेक मंडळी आत बसलेली असतात. रात्रीचा खेळ चाले, असा प्रकार सुरू असून चोवीस तास या ठिकाणी लागलेल्या कार कशाला आणि कुणाच्या, हे मात्र स्थानिक पोलिसांना दिसत नाही. जराही शंका येत नाही, हे मात्र नवलच आहे.

रात्रीच्या सुमारास येणारी आयशर कुणाची? त्यात कोणता माल येतो? मध्य प्रदेश नंबरची ही मिनी ट्रक कोणता माल आणते? प्राप्त माहितीनुसार, केळझरजवळील एका गावातील एक भामटा यात लिप्त असून सर्व खेळ हा राजरोसपणे चालतो. मात्र पोलिसांना माहिती नाही? याची माहिती पूर्ण परिसरात आहे. मात्र पोलिसांना नाही?

अनेक बातम्या प्रकाशित झाल्या, मात्र सेलू पोलिसांना काहीच हातात लागत नाही. याच ठिकाणी खरेदी केलेले चोरीचे डिझेल-पेट्रोल वर्धा गुन्हे शाखा पकडते, मात्र सेलू पोलिसांना काहीच माहीत नाही? सर्व प्रकार हा अनागोंदी सुरू आहे.

‘पैसा फेको, तमाशा देखो’ असा हा प्रकार असल्याने आता याविरोधात मानवाधिकार संघटनेच्या वतीने माननीय पोलीस महासंचालक यांना, पोलीस महानिरीक्षक साहेब, नागपूर तथा पोलीस अधीक्षक साहेब, वर्धा यांना एक पत्र देण्यात आले असून, येथील ठाणेदारांचे या धंद्यात साटेलोटे असल्याचा स्पष्ट आरोप करण्यात आला आहे.

इतकेच नव्हे तर परिसरातील अवैध धंदे, पोलीस कर्मचाऱ्यांची घुटमळ याचे सुद्धा लेखी विवरण देण्यात आले आहे. केळझर येथील ढाबा हा अत्यंत घातक गतिविधींसोबत जुळलेला असून, पोलिसांनी प्रामाणिकपणे लक्ष दिल्यास अनेक विषय पुढे येतील, असे गावकऱ्यांच्या माध्यमातून समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!