Advertisement

वर्धा पत्रकारितेला काळिमा फासणाऱ्या कथित पत्रकारांचा हैदोस? केळझर येथून डिझेल-पेट्रोल, गांजा, एमडीसारख्या कथित अवैध धंद्यांचा आरोप; धाब्यावरील अवैध धंदे बंद करा, अन्यथा आमरण उपोषण — मंगेश चोरे पाटील

समाचार शेयर करें

वर्धा पत्रकारितेला काळिमा फासणाऱ्या कथित पत्रकारांचा हैदोस?
केळझर येथून डिझेल-पेट्रोल, गांजा, एमडीसारख्या कथित अवैध धंद्यांचा आरोप; धाब्यावरील अवैध धंदे बंद करा, अन्यथा आमरण उपोषण — मंगेश चोरे पाटील

Screenshot

 

वर्धा (प्रतिनिधी) : वर्धा पत्रकारितेच्या इतिहासात यापूर्वी कधी घडले नाही, असे प्रकार सध्या घडत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते तथा मानवाधिकार संघटनेचे पदाधिकारी मंगेश चोरे पाटील यांनी केला आहे. पत्रकारितेच्या नावाचा गैरवापर करून  किशोर करंजेकर,निलेश पिंजारकर,प्रमोद पाणबुडे.नागरिकांमध्ये धास्ती निर्माण करण्याचा प्रकार सुरू असल्याचा त्यांचा दावा आहे.

मागील काळात तत्कालीन पोलीस अधीक्षकांच्या विरोधात आवाज उठविल्यानंतर आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप चोरे पाटील यांनी केला आहे. संबंधित प्रकरणे न्यायालयात असून, आपण दोषी असल्यास न्यायालयाचा निर्णय मान्य करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, काही कथित पत्रकारांकडून पत्रकारितेचा गैरवापर करून सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर प्रसारित केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या वाळू-मुरूम वाहतूक करणाऱ्या वाहनांना अडविणे, दारू विक्रेत्यांकडून पैशांची मागणी करणे तसेच विविध प्रकारे दबाव निर्माण करणे, असे प्रकार होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या सर्व बाबींची पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

केळझर येथील बंद धाब्यावर गंभीर आरोप

केळझर गावातील बंद असलेल्या एका धाब्यावर काही व्यक्तींचा वावर वाढला असून, त्या ठिकाणाहून कथित अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दिवसा डिझेल-पेट्रोलची कथित अवैध विक्री किंवा तस्करी आणि रात्री विविध प्रकारचे गैरप्रकार सुरू असल्याचा दावा चोरे पाटील यांनी केला आहे.

या ठिकाणी मध्यप्रदेशातून दारू आणली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तसेच गांजा आणि एमडीसारख्या अमली पदार्थांचा कथित पुरवठा होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या आरोपांची पोलिसांनी तातडीने चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी त्यांनी केली.

वाहनांची आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी

या कथित अवैध व्यवसायातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही व्यक्तींकडे महागडी चारचाकी वाहने, नियमित पार्ट्या आणि मोठ्या प्रमाणात खर्च करण्याची क्षमता कुठून आली, याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी चोरे पाटील यांनी केली आहे.

पत्रकारितेचा वापर करून एखाद्या व्यक्तीवर दबाव आणणे किंवा त्याची सोशल मीडियावर बदनामी करणे योग्य नसून, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, असे त्यांनी म्हटले आहे.

पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह

कथित अवैध धंद्यांबाबत काही पोलीस अधिकारी संबंधित व्यक्तींना संरक्षण देत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. जर असे प्रकार होत असतील तर त्यांची स्वतंत्र चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींचा गैरवापर करून धमकावले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मात्र अशा कोणत्याही कायद्याचा गैरवापर होऊ नये आणि खऱ्या तक्रारींवरच कायद्यानुसार कारवाई व्हावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.

“भ्रष्टाचार व हप्तेखोरीला विरोध कायम”

“आम्ही पत्रकारिता करतो, ती कोणताही धंदा म्हणून नव्हे. अधिकाऱ्यांचा कथित भ्रष्टाचार किंवा हप्तेखोरी खपवून घेतली जाणार नाही. कितीही दबाव आला तरी जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज उठवत राहू,” असे मंगेश चोरे पाटील यांनी सांगितले.

केळझर येथील संबंधित धाब्यावर सुरू असल्याचा आरोप असलेल्या सर्व कथित अवैध धंद्यांची तातडीने चौकशी करून ते बंद करण्यात यावेत. तसे न झाल्यास आपण आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा मंगेश चोरे पाटील यांनी सेलू पोलिसांना दिला आहे.

दरम्यान, या सर्व आरोपांची अधिकृत चौकशी होऊन सत्य परिस्थिती समोर येणे आवश्यक असून, संबंधित व्यक्तींची बाजूही प्रशासनाने नोंदवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!