Advertisement

महावितरण कंपनीच्या माध्यमातुन जनतेची लूट. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सुतवा? जनतेच्या प्रतिकिया

समाचार शेयर करें

महावितरण कंपनीच्या माध्यमातुन जनतेची लूट. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सुतवा? जनतेच्या प्रतिकिया

वर्धा (मंगेश चोरे पाटील) वर्धेतील जनता आता महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सुतविन्याच्या मार्गावर असुन या सरकारने खुलेआम लूट लावल्याचे स्पष्ट बोलत आहे.जनतेला जगणे मुश्किल केले असुन जनता मुकाट्याने जोवर पैसे भरेल तोवर कोटी रुपयाची वसुली केली असेल हे मात्र खरे.यांच्या मीटरच्या हिशोबाला हिशोब जुळत नाही.घरावर सोलर लावले तरी बिल पंचवीस हजार.आणि तत्पूर्वी कधी दोन हजाराच्या वर बिल आलेच नाही.अचानक गरिबांचा खिसा कापणाऱ्या या चोराना कोण धडा शिकविणार? असा प्रश्न उपस्तीत होत आहे.गरिबांच्या घरी जेवणाची सोय नाही.मात्र अधिकाऱ्यांनी प्रतेक वितरण कंपनीच्या कार्यालयात खासगी पोसलेले फंटरच गोर गरिबांच्या घरी जाऊन जाऊन त्याना पैसे भरण्या करिता नको ते बोलतात.त्यांचे जगणे मुश्किल करतात.मात्र हे कुणीही महावितरणचा कर्मचारी वसुलीला जात नाही हे मात्र विशेष.गरीबच्या पैशावर आलिशान जिवन जगणारे नेते केवळ गरिबांचे मास तोडुन खाण्याचे सोडुन बाकी सर्व प्रकारची लूटमार करत असल्याचा आरोप गोर गरीब जनतेचा आहे. आणि या विष्ठा खाण्याच्या प्रकारात वितरण कंपनीचे अधिकारी सुद्धा समाविष्ठ झाले आहेत असा सुद्धा आरोप होत आहे.आज जरी मोठ्या जिवावर कर्जबाजारी होऊन जनता पैसे भरत असली तरी पुढील काही दिवसात प्रथम महावितरण कंपनीच्या अधिकारी कर्मचारी याना रस्त्यावर सुतावेल हे मात्र तेवढेच खरे असे चित्र दिसते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!