आयएचआरएच्या वर्धा जिल्हा संघटकपदी श्री. प्रकाश डोडानी; जिल्हाध्यक्षपदाचा प्रभारी पदभारही सोपविला
वर्धा (प्रतिनिधी): अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेच्या (आयएचआरए) वर्धा जिल्हा संघटकपदी श्री. प्रकाश डोडानी यांची नियुक्ती करण्यात आली असून, वर्धा जिल्हा अध्यक्षाची निवड होईपर्यंत त्यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाचा प्रभारी पदभारही सोपविण्यात आला आहे.नागपूर येथील हॉटेल रेडिसनमध्ये आयोजित राज्य व विदर्भ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. सेवाभावी वृत्ती आणि सामाजिक कार्याची उल्लेखनीय पार्श्वभूमी लक्षात घेऊन केंद्रीय उपाध्यक्ष श्री. जोसब मलबारी यांच्या आदेशानुसार श्री. प्रकाश डोडानी यांची या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली.
राज्याध्यक्ष श्री. मंगेश चोरे (पाटील) तसेच विदर्भ अध्यक्ष डॉ. मंगेश साठे यांच्या हस्ते श्री. प्रकाश डोडानी यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. वर्धा जिल्हा अध्यक्षाची नियुक्ती होईपर्यंत जिल्हाध्यक्षपदाचा प्रभारी कार्यभारही त्यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
नियुक्तीनंतर श्री. प्रकाश डोडानी यांनी संघटनेच्या केंद्रीय व राज्य नेतृत्वाचे आभार मानत, मानवाधिकार संरक्षण आणि सामाजिक न्यायासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या नियुक्तीबद्दल संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Leave a Reply