रोठा प्रकरणात आरोपीला कठोर शिक्षा होणारच; ठाणेदारांचा ठाम विश्वास

वर्धा (मंगेश चोरे पाटील) : वर्धा जिल्ह्यातील रोठा येथे नुकत्याच घडलेल्या अल्पवयीन शाळकरी मुलीवरील अत्याचार व हत्या प्रकरणाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या अमानुष घटनेनंतर सावांगी (मेघे) पोलिसांनी अतिशय कमी वेळेत तपासाची सूत्रे हाती घेत आरोपीला अवघ्या दोन तासांत अटक करून तपासाची गती दाखवून दिली.मिळालेल्या माहितीनुसार, घरात मुलगी एकटी असल्याची संधी साधून राहुल मडावी हा आरोपी घरात घुसला. त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिच्या डोक्यावर दगडाने वार करून तिची निर्घृण हत्या केली. काही वेळानंतर मुलीची आई घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तत्काळ सावांगी (मेघे) पोलिसांना माहिती देण्यात आली.
वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला तातडीने सुरुवात करण्यात आली. सावांगी (मेघे) पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्री. गिरी यांच्या नेतृत्वाखालील पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेने विविध तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला. कोणताही गाजावाजा न करता, अत्यल्प मनुष्यबळात आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करत पोलिसांनी आरोपीला केवळ दोन तासांत अटक केली.














Leave a Reply