Advertisement

पुरवठा अधिकारी यांच्या वाहनाला ठोस मारणारा टँकर कुणाचा? तस्करांचा तपास करावा…जनतेची मागणी.

समाचार शेयर करें

पुरवठा अधिकारी यांच्या वाहनाला ठोस मारणारा टँकर कुणाचा? तस्करांचा तपास करावा…जनतेची मागणी.

     हेच ते सेलूचे डिझेल पेट्रोल तस्कर, अतिक भाई…. डॉन डिझेल वाले…. सेलू ते केळझर पर्यंतच्या डिझेल पेट्रोल तस्करीचे पुष्पा… 

            वर्धा(मंगेश चोरे पाटील) सेलु परिसरातील धानोली(मेघे)गावाजवळ सेलू तहसील कार्यालयातील पुरवठा अधिकारी यांच्या वाहनाला धडक देणारा टँकर कुणाचा याचा अद्याप थांगपत्ता नाही.यामुळे तस्करांना कुणाचे अभय आहे?यावर सर्वत्र चर्चा होत आहेत.सेलू ते केळझर हा परिसर डिझेल आणि पेट्रोल चोरीचा हब झाला असुन याचा मुख्य सूत्रधार हा सेलू येथील अतिक नावाचा एक इसम असल्याचे बोलले जाते.मात्र या प्रकरणात पोलिसांनी कोणतीही भूमिका घेतल्याचे दिसुन आले नाही.आजही राजरोस डिझेल पेट्रोलची तस्करी सुरू आहे.ही बाब अत्यंत लाजीरवाणी असुन केवळ दोन पैसे मिळविण्या करिता जनतेच्या जीवाशी खेळण्याचा हा लाजिरवाणा प्रकार आहे.

केळझर येथील कॅनल लगत असलेल्या एका धाब्यावर खुलेआम डिझेल पेट्रोल चा काळा बाजार सुरू आहे.मात्र सेलू पोलिसांना हा प्रकार दिसत नाही.झालेल्या प्रकारात महिला अधिकारी यांचे प्राण गेले असते.असे प्रकार केले तरी कुणाचे वाकडे होत नाही त्यामुळे पुढील काळात कोणताही अधिकारी जिवावर घेऊन पुढे येणार नाही.म्हणजेच तस्कर आदिक निर्धास्त होऊन आपला धंदा करेल.सेलू प्रकरणात तस्करीचा प्रमुख गिरीश राजपाल आणि अतिक याची कसून चौकशी करावी आणि प्रकरणाचा उलगडा करावा अशी मागणी जोर धरत आहे… क्रमश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!