वर्धा येथे सरकारी गहू बँड करून बाजारात ?
महदेवपुरा परिसरातील नवा तस्कर कोण ?

वर्धा(मंगेश चोरे पाटील) वर्धा शहरातील हा नवाज कोण? प्राप्त माहितीवरून वर्धा शहरात हल्लीच एक मोठा सरकारी. तांदूळ,आणि गहू तस्कर उघड झाला आहे.अनेक दिवसापासून सुरू असलेल्या अनाज धंद्यात आता या तस्कराने सरकारी तांदूळ आणि गहू खरेदी करून बाजारात ब्रँड आणला असुन यातील सर्व प्रकार कॅमेऱ्यात आल्याने पोल खोल झाली असुन लवकरच याची उचलेगिरी उघड झाली आहे.दोन कोटी रुपयाचा क्रिकेट जुगार हरणारा हा वर्षातील तेलगी आता प्रशासनासमोर उघड होणार असल्याचे चिन्ह दिसत आहे.गावभर फिरून गरिबांचा तांदूळ खरेदी करणारा हा एकच व्यक्ती हल्ली वर्धा शहरात कोटी रुपयाची उलाढाल करीत असल्याचे उघड झाले असुन. चोरलेले गहू आणि तांदूळ मात्र.बनावट बिल दाखवून नंबर एक मध्ये दाखविला जात असल्याने प्रशासनाने याची कसून चौकशी करणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.हल्ली ही मंडळी एका मंत्री महोदयांचे नाव वापरत असुन आपल्या डोक्यावर साहेबांचा हात असल्याचे खुलेआम सांगत असल्याने.खरोखर यांना कोणी मंत्री या सरकारी धान्याच्या चोरीला.मदत करेल काय?यावर चर्चा होत आहे.हल्ली आपल्या जिल्ह्यात अनेक अवैध्य धंदेवाले आपण मंत्र्याचे माणसं असल्याचे सांगुन.नाहक मंत्र्याची प्रतिमा खराब करण्याचे अनेक प्रकार पुढे आले आहे.
सदर इसमाची वर्धा एम.आय.डी.सी परिसरात मोठे गोडाऊन आहे.आणि त्या ठिकाणी सरकारी स्वस्त धान्याचे दुकानातील तांदूळ आणि गहू साफ करून त्याला फिल्टर करून.ब्रँड लाऊन बाजारात विकले जाते.असे सूत्रांकडून पुढे आले आहे.संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे
.














Leave a Reply