Advertisement

वर्धेत जुनी नगर परिषद इमारत बनली जुगाराचा अड्डा; दररोज लाखोंची उलाढाल

समाचार शेयर करें

वर्धेत जुनी नगर परिषद इमारत बनली जुगाराचा अड्डा; दररोज लाखोंची उलाढाल

वर्धा (प्रतिनिधी – मंगेश चोरे पाटील):
वर्धा शहरात सध्या बेकायदेशीर प्रकारांना उधाण आले असून, मलगुजारी पुरा परिसरातील जुनी नगर परिषद इमारत आता जुगाराचा अड्डा बनल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्थानिक रहिवासी इर्शाद हा आपल्या वडील आणि भावाच्या मदतीने या पडक्या इमारतीत मोठ्या प्रमाणात जुगार चालवत असल्याचा आरोप आहे.माहितीनुसार, या ठिकाणी गेल्या अनेक महिन्यांपासून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असूनही वर्धा शहर पोलिसांना याची कोणतीही खबर नसल्याचे दिसून येत आहे, ही बाब आश्चर्यकारक मानली जात आहे.यापूर्वी गुन्हे शाखेने या ठिकाणी धाड टाकली होती. मात्र त्यानंतरही जुगाराचा व्यवसाय अधिक जोमाने सुरू असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जाते. “एस.के. पान मंदिर” या नावाखालील टपरीच्या आडून हा जुगार चालवला जात असल्याचेही उघड झाले आहे.या जुगार अड्ड्यामुळे परिसरातील दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जुगार खेळण्यासाठी येणारे लोक आपली वाहने कुठेही उभी करतात, आणि याबाबत विरोध केल्यास शिवीगाळ व दमदाटी केली जाते, अशी तक्रार काही व्यापाऱ्यांनी केली आहे.तसेच, काही भ्रष्ट पोलीस कर्मचारी येथे हप्ता वसुलीसाठी येत असल्याचेही आरोप स्थानिकांनी केले आहेत. या गंभीर प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.नगर परिषदेची जुनी इमारत अशा बेकायदेशीर कामांसाठी खुलेआम वापरली जात असतानाही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.संबंधित प्रशासनाने तात्काळ या जुगार अड्ड्यावर कारवाई करून तो बंद करावा तसेच जुनी नगर परिषद इमारत सील करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!