Advertisement

मारहाण प्रकरणातील पोलिस शिपाई शिंदे याला निलंबित करण्याची मागणी;

समाचार शेयर करें

मारहाण प्रकरणातील पोलिस शिपाई शिंदे याला निलंबित करण्याची मागणी;

हाच तो रामनगर पोलिस ठाण्यातील पोलिस लखपती शिपाई.हप्ताखोरी,दादागिरी गरिबांना पोलिस ठाण्यात मारहाण करणारा.पोलिस प्रसाद शिंदे

वर्धा (मंगेश चोरे पाटील)
वर्धा शहरातील रामनगर पोलीस ठाण्यात घडलेल्या मारहाणीच्या गंभीर घटनेमुळे पोलीस विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तक्रार देण्यासाठी गेलेल्या युवकाला पोलीस शिपाई प्रसाद शिंदे यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला असून, संबंधित शिपायाला तात्काळ निलंबित करण्याची मागणी जोर धरत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुलफैल परिसरातील रहिवासी आदित्य खात्री हा वडार पुरा (आर्वी नाका परिसर) येथे गेला असता त्याच्यावर काही व्यक्तींनी मारहाण केली. या घटनेची तक्रार देण्यासाठी तो रामनगर पोलीस ठाण्यात गेला. मात्र, त्याची तक्रार नोंदवून घेतली गेली नाही, असा आरोप आहे.
तक्रार न घेतल्यामुळे संतप्त झालेल्या युवकाने पोलिसांशी वाद घातला. त्यावेळी उपस्थित असलेल्या पोलीस शिपाई प्रसाद शिंदे यांनी संतापाच्या भरात युवकाला मारहाण केल्याचे सांगितले जाते. या मारहाणीत युवकाच्या पोटावर गंभीर दुखापत झाली असून त्याला तातडीने सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, घटनेनंतर हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस यंत्रणा हलली. जखमी युवक रुग्णालयात असताना पोलीस त्याचा जबाब नोंदवण्यासाठी तेथे पोहोचले. यामुळे, सुरुवातीला तक्रार का घेतली नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी निष्काळजीपणा आणि अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. तसेच, या घटनेची सखोल चौकशी करून दोषी पोलीस शिपाई प्रसाद शिंदे याला निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, संबंधित प्रकरण मानवाधिकार आयोगाकडे दाखल करण्यात येणार असून, उद्या पोलीस महासंचालकांकडेही तक्रार सादर करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!