Advertisement

अनेक कार्यकर्त्यांसह राकेश पांडे यांचा छत्रपती सेनेत प्रवेश

समाचार शेयर करें

संघटनेच्या कार्यप्रणालीत अधिक बळकटी निर्माण व्हावी या उद्देशाने आयोजित पदाधिकारी बैठकीत राकेश पांडे यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह छत्रपती सेनेत प्रवेश केला. पुढील काळात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे पालन करून गोरगरीब जनतेची सेवा करू, अशी भावना पांडे यांनी व्यक्त केली.

यावेळी पांडे यांना भगवा देऊन पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. मंगेश चोरे (पाटील) यांनी मनोगत व्यक्त करताना स्पष्ट केले की, ही संघटना सर्वांची असून समाजहिताचे कार्य करणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत आहे. गोरगरिबांची सेवा हेच आमचे ध्येय असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे आचरण करून जीवन जगणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.

या प्रसंगी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष प्रा. रमेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश प्रक्रिया पार पडली. तसेच जिल्हा उपाध्यक्ष श्री. प्रकाश डोडानी, विदर्भ उपाध्यक्ष श्री. सूर्यप्रकाश पांडे, फाउंडेशन सल्लागार श्री. राजाभाऊ साबळे, जिल्हा सचिव श्री.गजानन दांडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास संघटनेचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!