भ्रष्टाचार करू दिला जाणार नाही
आता मेल्या कोंबडीला आगीची भीती नाही.
वर्धा (मंगेश चोरे पाटील)
भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांना धमक्या देऊन, खोट्या गुन्ह्यांत अडकवून गप्प करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र आता मेल्या कोंबडीला आगीची भीती नसते. आम्ही गजानन महाराजांचे भक्त आहोत; अशा धमक्यांना भीक घालणारे नाही.
सध्या वर्धा जिल्ह्यात पोलिस अधीक्षकांच्या आडोशाला काही निवडक पोलिस अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अवैध धंदे करणाऱ्यांना मोकळे रान दिल्याचे चित्र दिसत आहे. सावंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या रेती वाहतूक प्रकरणाचा पर्दाफाश ‘जनसंग्राम’ या डिजिटल पोर्टलने नुकताच केला. त्यानंतर आम्ही त्याच परिसरात सुरू असलेल्या डिझेल–पेट्रोल तस्करीचा देखील भंडाफोड केला.
या कारवायांमुळे अनेकांची लाखों रुपयांची बेकायदेशीर आवक बंद झाली आहे. हे आरोप केवळ बोलघेवडे नसून विश्वसनीय पुरावे जपून, तपासूनच आम्ही प्रकाशित करीत आहोत.
“मुंह में राम, बगल में छुरी” अशी परिस्थिती सध्या सावंगी पोलिस ठाण्यात सुरू असून, अधिकाराचा सर्रास गैरवापर होत आहे. इतकेच नव्हे तर पत्रकारांनाही घाबरवण्याचे प्रकार उघडपणे सुरू आहेत.
आमचे काय? आम्ही शेवटी पत्रकार आहोत.
मेलो तरी चालेल, पण सत्य लिहिणे थांबवणार नाही. भ्रष्टाचारी अधिकारी खोट्या केसेस दाखल करू शकतात, मात्र त्या सिद्ध करण्याची जबाबदारीही त्यांचीच असते. अन्यथा संविधान जनतेला अधिकार देते की अशा लोकांची वस्त्रेहरण कशी होते ते पाहायला वेळ लागत नाही.
यापूर्वीही तत्कालीन पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे आम्ही उघड केले होते. त्यानंतर भीतीपोटी आमच्यावर अनेक खोट्या केसेस दाखल करण्यात आल्या. आम्ही जेलमध्ये गेलो, बारा दिवस रोटी तोडली.
पण आज पुन्हा सांगतो आता मेल्या कोंबडीला आगीची भीती नाही. आता मेल्या कोंबडीला आगीची भीती नाही.
परत जेलमध्ये जावे लागले तरी जाऊ.
मात्र आमचा स्वभाव, आमची लेखणी आणि सत्याची बाजू कधीच बदलणार नाही.















Leave a Reply