*पोलिस अधीक्षकांच्या आडून डिझेल तस्करीला परवानगी ?
एक लाख पंचवीस हजार रुपये घेऊन परवानगी दिल्याची तस्करांनीच दिली माहिती
नायरा डेपो परिसरात मोठा स्फोट होण्याची दाट शक्यता?
रस्त्याने जाणारे आले धास्तीत…**
वर्धा (मंगेश चोरे पाटील) — जिल्ह्यात सर्वत्र अवैध धंदे बंद असताना हल्लीच सावंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत डिझेल पेट्रोल तस्करीचा मोठा धंदा सुरू झाला आहे. हे डिझेल तस्कर खुलेआम रस्त्यावर टँकर उभे करून डिझेल पेट्रोल काढत असून, पोलिस ठाण्याला एक लाख पंचवीस हजार रुपये महिना देऊन परवानगी घेतल्याच्या बाता ते खुलेआम करीत आहेत.
सावंगी येथील एका जमादाराचे खुलेआम नाव घेतले जात असून, महामार्गावरील एका पोलिस ठाण्याच्या डी.बी. इन्चार्जने सेटिंग करून दिल्याचे हे तस्कर स्पष्टपणे सांगत सुटले आहेत.
गेल्या आठवड्यापासून दररोज हजारो लिटर डिझेल–पेट्रोल रस्त्यावरच काढले जात असून, आजही या महामार्गावर ठिकठिकाणी डिझेल पेट्रोल सांडलेले दिसून येते. प्राप्त माहितीनुसार प्रति दिवस पाच लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे डिझेल पेट्रोल तस्करीतून बाहेर काढले जात असून, महिन्याला दीड कोटी रुपयांची तस्करी होत असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
हे तस्कर नामांकित तस्कर असून, यापूर्वी केळझर परिसरात सक्रिय होते. यांची माहिती गुन्हे शाखा वर्ध्याचे पोलिस निरीक्षक श्री. चौधरी यांना मिळताच त्यांनी अनेक वेळा यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तस्करांना माहिती मिळताच त्यांनी आपले बस्तान सावंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत हलवले.
मागील आठवड्यापासून हे खुलेआम तस्करी करीत असून, रोज आलेला माल शहरातील महिला आश्रम परिसरातील पेट्रोल पंप चालक गिरीश राजपाल यांच्या पंपावर दिला जातो. या संपूर्ण तस्करीचा मास्टरमाइंड गिरीश राजपाल असल्याचे सांगितले जाते.
मागील काळात वर्धा पोलिसांचा पेट्रोल पंप बंद पडण्यात यांचा मुख्य सहभाग असल्याचेही बोलले जाते. आज पोलिसांच्या पेट्रोल पंपाचे प्रकरण कोर्टात गेले असून, राजपाल यांचे गोरखधंदे राजरोस सुरू असल्याची चर्चा सुरू आहे.
जिल्यातील सर्व ठिकाणी अवैधरित्या काढले जाणारे पेट्रोल डिझेल याच पंपात ओतले जाते, आणि अनेक तस्करांना यांच्याचकडून निधी दिला जातो, हे मात्र विशेष.














Leave a Reply