सेलू ठाणेदार यांच्या वसुली कार्यक्रमाने कर्मचारी हैराण.ठाणेदार हाकला! मोहीम तेज?

Screenshot
वर्धा (प्रतिनिधी ) महमार्गावरील सेलू पोलीस ठाण्यातील ठाणेदार यांनी खुलेआम वसुली सुरू केल्याचा आरोप आता कर्मचारी करायला लागले असून साहेबांनी अनेक अवैद्य धंदे खुले केले आहेत,कर्मचारी कोणतीही कारवाई करू शकत नाही,असा नवीन नियम तयार केल्याचे बोलले जाते.एका कर्मचाऱ्याने हप्ता वाढविण्याचे साहेबाचे संभाषणच रेकॉर्ड करून ठेवले.एकीकडे वर्धा पोलीस अधीक्षक अत्यंत नियमात आणि भ्रष्टाचाराला थारा देत नसतांना दुसरीकडे काही अधिकारी आपल्या स्वार्थासाठी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही मान ठेवत नाही.हे यावरून दिसुन येते.जे आजवर झाले नाही ते सेलू ठाण्यात होण्याची शक्यता निर्माण झाली असून येथिल सर्व कर्मचारी हे पोलीस निलंबित झालो तरी चालेल पण काम बंद आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जाते.कर्मचाऱ्यांच्या सांगण्यावरून साहेबांनी किमान साठ लाख रुपयांची मासिक हप्ता बांधणी केली .त्यामुळे सगळे खुलेआम सुरू असून कर्मचारी गेल्यास अवैध धंदेवाईक मोजत सुद्धा नाही . प्राप्त माहिती वरून गावठी दारू,जुगार,डिझेल पेट्रोल,गांजा,दारूची वाहतूक,आणि करवाईच्या नावावर लुबाडणूक इत्यादी गोष्टीचा समावेश आहे… प्राप्त माहिती ही अंतर्गत कर्मचारी वर्गातून असुन…काही गौप्य गंभीर प्रकार पुढे प्रकाशित करू…













Leave a Reply