वर्धेत महिला पुरवठा अधिकारी माजरखेडे बाईने केला बत्तीस लाखाचा बोफोर्स . गुन्हा दाखल होताच मॅडम फरार….?

Screenshot
वर्धा (मंगेश चोरे पाटील) वर्धा जिल्ह्यात कार्यरत महा लालची महिला पुरवठा अधिकारी मनीषा माजरखेडे आणि अन्य काहीच्या माध्यमातून बत्तीस लाखाचा स्वस्त धान्य घोटाळा करून गुन्हा दाखल होताच मॅडम आपल्या साथीदारांना घेऊन फरार झाल्या . मागील काही दिवसापूर्वी याच ठिकाणी एका अधिकाऱ्याला लाच घेताना पडले होते.त्याची कारागृहात रवानगी झाली मागोमाग दुसरीही उपजिल्हाधिकारी महिला कोटी रुपयाच्या जामीन आदिग्रहण प्रकरणात कारागृहात गेली.गेल्या अनेक दिवसापासुन कारागृहात बसलेल्या उपजिल्हाधिकारी महिलेचा जामीन झालेलाच नाही.आणि परत माजरखेडे नामक महिला अधिकारी यांनी बोफोर्स केला.प्राप्त माहिती वरून महिला अधिकारी माजरखेडे , आणि विक्रेता योगेश बाली आणि अन्य लोकांच्या विरोधात वर्धा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.619 नकली राशनकार्ड तयार करून हा घोटाळा करण्यात आल्याचे बोलले जाते. सदर महिला अधिकारी ही जिल्यातील अनेक पेट्रोल पम्प मालकांच्या माध्यमातून महिन्याला लाखो रुपये गोळा करीत असल्याच्याही चर्चा असुन यांनी आपल्या कार्यकाळात कोटी रुपयाचीअतिरिक्त मालमत्ता जमवल्याचे सुद्धा पुढे आले आहे.यामुळे यात लाचलुचपत विभागची सुद्धा चौकशी करण्यात यावी असे बोलले जाते.मांजरखेडे मॅडम सध्या फरार असुन पोलीस शोध घेत आहेत.













Leave a Reply