कथित पत्रकार बलात्कार प्रकरणात नविन प्रकार पुढे . परत एक सामुहिक अत्याचाराचा विषय…..पुढे पोलिसात तक्रार ?
वर्धा (मंगेश चोरे पाटील) वर्धा येथिल कथित बलात्कारी पत्रकार किशोर कारंजेकर याला पोलिसांनी अटक करून कारागृहात टाकल्या नंतर सेलू तालुक्यातील एका अविवाहित महिलेने तोच प्रकार पुढे आणला होता.सदर प्रकरणात आता सविस्तर माहिती पुढे आली असुन यात अनेकांची नावे पुढे येत आहेत असे समजते. सदर आरोपी हा कारागृहात असल्याने या प्रकरणात अद्याप तक्रार देण्यात आली नसुन लवकरच यात तक्रार होणार असे चित्र आहे.सादर पिडीत ही सुशिक्षित असुन हिला जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयात नोकरी लाऊन देण्याचे आमिष देण्यात आल्याचे बोलले जाते.यात वर्धेतील काही आदिक पत्रकारिता विषयात कार्यरत असणाऱ्यांचीही नावे पुढे येत असल्याने हा सामूहिक बलात्काराचा प्रकार उघड होणार की काय?अशी चर्चा आहे.मागील वीस दिवसापासून कारागृहात असलेल्या कथित पत्रकाराच्या बल्तकाराच्या आरोपात आज सुनावणी होणार असुन लगेच दुसरे प्रकरण सुद्धा पुढे आले असुन मागील चार वर्षापासुन शहरात गँगवारी सुरू करून पत्रकारितेच्या नावावर अनेक कांड केलेल्या करंजेकर अँड गैंग ने.नोकरी लाऊन देण्याचे आमिष देऊन एका मुलीला नाशिक येथे नेले.आणि कुकर्म केले हा प्रकार सुद्धा पुढे आला आहे? नाशिक येथिल एका हॉटेलच्या बिलानुसार यावेळी तीन खोल्या बुक केल्या होत्या अशी माहिती समजते.आरोपी किशोर कारंजेकर याच्या नावा वेतिरिक्त आदिक दोन नावांचा यात समावेश असल्याचेही पुढे येत आहे.सदर पिडीत महिला ही या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल करण्या करिता प्रयत्नशील असल्याचेही सूत्रांकडुन समजते.
Leave a Reply