सेलूत डिझेल माफियांचा थैमान! पुरवठा अधिकारी महिलेवर जीवघेणा हल्ला.
सेलू पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू तस्करी?
लाखोंचा काळाबाजार उघड …
सेलू तालुका पुरवठा अधिकारी यांच्यावर जीवघेणा हमला करण्याच्या मागचा मुख्य सूत्रधार गिरीश राजपाल याचा हा फँटर अतिक.. सेलु पोलिसांच्या आशीर्वादाने करतो खुलेआम तस्करी, सेलु केळझर येथे मोठा धंदा
वर्धा (मंगेश चोरे पाटील)
सेलू तालुक्यात डिझेल-पेट्रोल तस्करीचा काळाबाजार दिवसेंदिवस बिनधास्तपणे वाढत असून, आता या माफियांची हिंमत इतकी वाढली आहे की त्यांनी थेट सरकारी अधिकाऱ्यावरच जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
तालुका पुरवठा अधिकारी अचल बांगरे या तस्करीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी गेल्या असता, तस्करांनी त्यांच्या वाहनावर धडक देत हल्ला केला आणि त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप आहे. या घटनेमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.
या संपूर्ण रॅकेटचा सूत्रधार गिरीश राजपाल उर्फ ‘बुकऱ्या’ असल्याचे बोलले जात आहे. त्याने तालुक्यात विविध ठिकाणी आपले ‘फँटर’ (सहकारी) बसवून मोठे जाळे तयार केले आहे. अतिक नावाचा इसम सेलू तालुक्यात हा अवैध धंदा चालवत असल्याची माहिती पुढे येत आहे नागपूर, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळकडे जाणाऱ्या टँकरमधून दिवसभर डिझेल-पेट्रोल चोरी रात्री राजपालच्या वाहनांद्वारे माल गोळा महिला आश्रम परिसरातील पेट्रोल पंपावर मोठ्या टाकीत साठवण त्यानंतर काळाबाजारात विक्री दररोज लाखो रुपयांची उलाढाल केळझर येथील धाबा परिसर
दहेगाव पुलाजवळ सेलू तालुक्यातील विविध गुप्त ठिकाणे या सर्व प्रकारात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, हा अवैध धंदा सेलू पोलिसांच्या कथित आशीर्वादाने सुरू असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. हप्ते देऊन हा व्यवसाय सुरू असल्याचे तस्कर उघडपणे सांगत असल्याची चर्चा आहे.पोलिस प्रशासन नेमके कोणाच्या दबावाखाली आहे?सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ला होईपर्यंत कारवाई का झाली नाही?आज वाहनावर हल्ला… उद्या खून झाला तर जबाबदार कोण?













Leave a Reply