Advertisement

माजी आमदार प्रा. राजू तिमांडे यांना पितृशोक

समाचार शेयर करें

हिंगणघाट : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे नेते व माजी आमदार प्रा. राजू तिमांडे यांचे वडील, सेवानिवृत्त प्राचार्य वासुदेव बालाजी तिमांडे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ७८ वर्षे होते.

वासुदेव तिमांडे यांनी संत साईबाबा विद्यालय, बुरकोनी येथे प्राचार्य पदावर कार्य केले होते. तसेच जय भारती शिक्षण संस्थेचे ते सचिव म्हणूनही कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात शिक्षण क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले होते.

प्रकृती अस्वस्थतेमुळे त्यांना नागपूर येथील एस. एस. हॉस्पिटलमध्ये काही दिवसांपूर्वी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र १७ एप्रिल रोजी सायंकाळी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर वन नदीच्या तीरावरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

या वेळी विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी तसेच शिक्षण क्षेत्रातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून तिमांडे कुटुंबीयांच्या दुःखात सहभाग नोंदविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!