*सेलू–केलझर परिसरात चोरीचे लोखंड व डिझेल-पेट्रोल तस्करी जोरात.
गुन्हे शाखेचे लक्ष, तस्करांवर कारवाईची शक्यता**
वर्धा(प्रति)
सेलू–केलझर परिसरात लाखो रुपयांची डिझेल-पेट्रोल तस्करी तसेच चोरीच्या लोखंडाचा अवैध व्यवसाय खुलेआम सुरू असल्याची गंभीर माहिती समोर येत आहे. ही तस्करी नेमकी कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? असा प्रश्न आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही डिझेल तस्करांना स्थानिक पातळीवर संरक्षण मिळत असल्याचा संशय असून, त्यामुळेच हा अवैध व्यवसाय निर्धास्तपणे सुरू असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणाकडे आता गुन्हे शाखेने लक्ष वेधले असून, तस्करांना रंगेहात पकडण्यासाठी एक विशेष पथक सातत्याने पाळत ठेवून असल्याचे संकेत मिळत आहेत.
अलीकडेच सावंगी परिसरातील डिझेल-पेट्रोल तस्करीचा पर्दाफाश झाल्यानंतर तेथील हालचाली तात्पुरत्या स्वरूपात बंद झाल्या असल्या, तरी केलझर व सेलू परिसरात तस्करांनी पुन्हा जोमाने आपले जाळे उघडले असल्याचे समजते.
या सर्व प्रकारामागे नेमके कोणाचे आशीर्वाद आहेत, याचा शोध घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, छत्रपती सेना यांच्याकडून या प्रकरणाबाबत लवकरच पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, प्रशासनाकडून त्वरित व कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.















Leave a Reply