Advertisement

**परत डिझेल–पेट्रोलचा काळा धंदा सुरू?

समाचार शेयर करें

**परत डिझेल–पेट्रोलचा काळा धंदा सुरू?

सावंगी–सेलू परिसरात हालचाली वाढल्या, मोठ्या अपघाताची भीती**

वर्धा (प्रतिनिधी : मंगेश चोरे पाटील)
मागील काही काळ बंद असलेला डिझेल–पेट्रोलचा कथित काळा धंदा पुन्हा एकदा सुरू झाल्याचे आरोप समोर येत आहेत. सेलू, केलझर आणि सावंगी परिसरातील डिझेल–पेट्रोल मोठ्या प्रमाणात वर्धा शहरातील एका पेट्रोल पंपावर नेले जात असल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे.

स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, सेलू येथून सेवाग्राम मार्गे खुलेआम डिझेल–पेट्रोलची वाहतूक करण्यात येत असून ते वर्धा येथील महिला आश्रम परिसरातील एका पेट्रोल पंपावर आणले जात आहे. विशेष म्हणजे, मागील दोन महिन्यांपूर्वी हा प्रकार काही दिवस बंद होता; मात्र सध्या तो पुन्हा जोमात सुरू असल्याचे बोलले जात आहे.

या कथित भेसळयुक्त डिझेल–पेट्रोलमुळे शहरातील अनेक वाहनांचे नुकसान झाल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. त्यामुळे अनेक वाहनधारकांनी संबंधित पेट्रोल पंपावरून इंधन भरणे टाळले असल्याचेही सांगितले जात आहे.

नागरिकांमध्ये या प्रकारामुळे मोठ्या दुर्घटनेची भीती व्यक्त केली जात असून, साठवणूक व वाहतुकीदरम्यान मोठा स्फोट किंवा आग लागण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, हा कथित अवैध धंदा तात्काळ बंद करावा व संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!