Advertisement

सेवाग्राम रुग्णालयातील आरोग्य योजनांबाबत गंभीर तक्रारी, ड्युटीच्या वेळेत,देशपांडेची झुणका पार्टी.

समाचार शेयर करें

सेवाग्राम रुग्णालयातील आरोग्य योजनांबाबत गंभीर तक्रारी, ड्युटीच्या वेळेत,देशपांडेची झुणका पार्टी.

(मंगेश चोरे पाटील)
सेवाग्राम येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या अनेक सेवाग्राम रुग्णालयातील आरोग्य योजनांबाबत गंभीर तक्रारी सेवाग्राम येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या अनेक दिवसांपासून काही कर्मचाऱ्यांच्या कथित हलगर्जीपणामुळे रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. विशेषतः राजीव गांधी जन आरोग्य योजना तसेच इतर शासकीय आरोग्य योजनांचा लाभ अनेक रुग्णांना मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.आणि आपल्या ड्युटी च्या वेळेत देशपांडे,कोणत्या महिलेला घेऊन झुणका पार्टी करतात? देशपांडे यांच्या कृष्णलीला पुढील अंकात प्रकाशित करूच तूर्तास.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजी गांधी जन आरोग्य योजनेच्या केंद्रातील जबाबदार अधिकारी कर्तव्याच्या वेळेत केंद्रावर अनुपस्थित राहतात, त्यामुळे रुग्णांचे काम खोळंबते. काही वेळा अधिकारी कार्यालयीन वेळेत नसल्याने रुग्णांना तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागत असल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे.
“शासकीय योजनेचा लाभ हा जनतेचा हक्क आहे. मात्र येथे तो हक्कच हिरावून घेतला जातोय,” अशी प्रतिक्रिया अनेक रुग्णांनी दिली. उपचारासाठी दूरदूरहून आलेले गरीब व गरजू रुग्ण या व्यवस्थेमुळे त्रस्त झाले आहेत.तक्रारदारांच्या मते, संबंधित अधिकारी जबाबदारी टाळण्याची भूमिका घेत असून “मी नाही, ते दुसरे” असा पवित्रा घेतल्यामुळे प्रशासनात संभ्रम निर्माण होतो. यामुळे सामान्य रुग्णांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.या प्रकाराबाबत आतापर्यंत किमान पंचवीसहून अधिक रुग्णांनी आपले अनुभव कथन केले असून, सेवाग्राम रुग्णालयातील कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रुग्णालय प्रशासनाने याची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी रुग्ण व नागरिकांकडून होत आहे.या प्रकरणावर प्रशासनाची भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.आणि देशपांडे याचा भोंगळ कारभार पुढील भागात वाचा…
क्रमशः

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!